VIDEO : धनंजय मुंडेची दिवाळी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसोबत

Foto

बीड - विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या वर्षी दिवाळी साजरी न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची व्यथा जाणून घेणार असल्याचेे म्हटले आहे. यासाठी धनंजय मुंडे दोन दिवसांपासून अंबाजोगाई तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत  आहेत.


मुंडे म्हणालेमाझ्यासाठी दिवाळीच्या सणापेक्षा शेतकर्‍यांसमोर असलेल्या दुष्काळाचे संकट अधिक महत्वाचे आहे. त्यामुळेच यंदा मी दिवाळी साजरी न करता शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेणार आहे.’ यासाठी धनंजय मुंडे अंबाजोगाईत आले आहेत. तालुक्यातील बर्दापूर गावात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पीकांची स्थिती जाणून घेतली. यावेळी ते म्हणाले, की हे सरकार शेतकरी विरोधी असल्याने तुम्हाला आधार देणार नाही.  त्यामुळे दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांनी हे सरकार उलथवून टाकण्यासाठी हातात रुमणे घेऊन सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.